Pune News: पुणेकरांना दिलासा! उद्याचा पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय; नियमित पाणीपुरवठा सुरू
Pune News: संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार

Pune News: पुणे महानगरपालिकेकडून गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेली पाणीकपात रद्द केली आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्या संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा अतिरिक्त साठा करण्याची किंवा पाण्याचे नियोजन बदलण्याची आवश्यकता नाही. शहरातील पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहे.
दरम्यान, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती लक्षात घेत महापालिकेने प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सणासुदीच्या काळात पुणेकरांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी दिवाळीच्या काळात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला.
हेही वाचा :





