Donald Trump PM Modi : “पंतप्रधान मोदी महान नेते; युद्धांपासून दूर राहतात” डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक
Donald Trump PM Modi : 'पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दोन जागतिक नेते'

Donald Trump PM Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील दोन महान नेत्यांपैकी एक म्हटले आहे. ट्रम्प यांनी, पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दोन जागतिक नेते आहेत, ज्यांचा ते सर्वाधिक आदर करत असल्याचे म्हंटले आहे.
‘एक्सिओस’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांना मुलाखतकाराने जगातील दोन महान नेत्यांची नावे विचारली, तेव्हा त्यांनी शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची नावे घेतली. जिनपिंग यांच्याबद्दल ट्रम्प यांनी ते नेतृत्वाच्या बाबतीत खरे आहे असे मला वाटते, असे म्हंटले.
तर पंतप्रधान मोदींच्या प्रदीर्घ कार्यकाळाची, त्यांच्या नेतृत्वशैलीची आणि भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली. फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेवरून परतल्यानंतर त्यांनी ही मुलाखत दिली.
मोदी एक उत्तम नेते (Donald Trump PM Modi )
पुढे ट्रम्प म्हणाले, “मला वाटते मोदी खूप चांगले आहेत. ते स्मार्ट आहेत, ते युद्धांपासून दूर राहतात. त्यांच्याकडे १.५ अब्ज लोकसंख्या आहे. त्यांचा देश सर्वात मोठा आहे. भारत प्रत्यक्षात सर्वात मोठा आहे आणि मोदी एक उत्तम नेते आहेत. मोदींची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यांचा प्रचंड आदर केला जातो. मला माहित आहे की खरे मोदी हे खूप कणखर आहेत. मी अशा काही नेत्यांना जवळून ओळखले आहे ज्यांना मी आधी नीट ओळखत नव्हतो.” मात्र, सर्वात कमकुवत नेते कोणते, याचे नाव देण्यास त्यांनी नकार दिला. Donald Trump PM Modi
“पंतप्रधान मोदींमध्ये शांतता आणि राजकीय ताकद यांचा अनोखा संगम आहे. ते प्रत्येक गोष्ट अत्यंत शांतपणे करतात, तरीही ते शांत स्वभावाचे नाहीत. ते खूप कणखर व्यक्ती आहेत, मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. जोपर्यंत पंतप्रधान मोदी सत्तेवर आहेत, तोपर्यंत भारत एक प्रमुख भूमिका बजावत राहील. खूप काळापासून मोदी माझे मित्र आहेत आणि आमचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. (Donald Trump PM Modi )
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी करार विचारले असता ट्रम्प यांनी, आम्ही करार करण्याच्या खूप जवळ आहोत. यावर बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यात भारत भूमिका बजावू शकतो, असे मला वाटते. प्रत्येक गोष्टीत भारत मोठी भूमिका बजावतो, असे सांगितले. Donald Trump PM Modi
हेही वाचा:
TOP 10 News : भाजपचे 3 आमदार फुटले ते कथित फोटोंवर महाजनांचे स्पष्टीकरण; जाणून घ्या आजच्या TOP 10 News…






