मेट्रो रुळावर आंदोलन करणाऱ्या ९ महिलांना दिलासा; जिल्हा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Pune | गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील पुणे महापालिकेच्या मेट्रो रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. विविध मागण्यांसाठी काही पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येत त्यांनी या मेट्रो स्थानकाच्या रुळावर आंदोलन केले होते. यावेळी एका आंदोलनकर्त्यांने स्वत:वर पेट्रोल ओतण्याचाही प्रयत्न केला होता. या आंदोनलाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये बाचाबाजी आणि धरपकड झाली. या प्रकऱणी न्यायलयाने एकूण ९ महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामुळे आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. रोजगावर व मोफत सेवांच्या मागण्यांसाठी पुणे मेट्रो स्थानकाच्या जवळील रुळावर हे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोनावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. परिणामी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांच्यामध्ये धरपकड झाली. या आंदोलनामुळे पुणे शहरातील मेट्रो सेवेवरही मोठा परिणाम झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल २ तास उशिराने मेट्रो सेवा सुरू झाली. आंदोलनामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनावर त्रास सहन करण्याची वेळ आली होती.





