मुंबईत रिलायन्स JIOची सेवा विस्कळीत
Updated On:

मुंबई – मोबाईल सेवा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीच्या मुंबईतील सेवेवर शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. जिओ नेटवर्क वापरणाऱ्या बऱ्याच ग्राहकांनी कंपनीकडे कॉल लागत नसल्याच्या तक्रारी केल्या. सकाळी बऱ्याच ग्राहकांनी कॉल किंवा मेसेज केल्यानंतर आपण नेटवर्कवर रजिस्टर्ड नाहीत असे संदेश येऊ लागले.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सेवा विस्कळीत झाली असल्याचे मान्य केले. यासंदर्भात चौकशी चालू असून सेवा ताबडतोब सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये रिलायन्स जिओच्या सेवेवर का परिणाम झाला याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र अशा अवस्थेमध्ये बऱ्याच ग्राहकांनी व्हाट्स ऍप च्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
टॅग्स:





