जिओचे नेटवर्क डाऊन: नेटवर्कला समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्त्ये परेशान

नवी दिल्ली – फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम पाठोपाठ आज देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे देशातील अनेक राज्यातील जिओचे ग्राहक परेशान झाले आहेत.
आज सकाळी 9 वाजता पासून जिओच्या नेटवर्टमध्ये समस्या येत आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये जिओ ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सोशल मीडियावर काही मिनिटांतच, #jiodown ट्रेंड करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओचे एकूण 404 दशलक्ष ग्राहक आहेत. या ग्राहकांना आज नेटवर्कचा सामना करावा लागला आहे. मात्र जिओच्या नेटवर्कला समस्या का आली हे अद्याप समोर आले ऩाही.





