5G ला विसरा! जिओने आणली त्याच्या पुढची हाय-स्पीड इंटरनेट सेवा; मिनिटात डाउनलोड होईल चित्रपट

Reliance Jio 5.5G Service: सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्याकडून ग्राहकांना 5जी सुविधा उपलब्ध केली जात आहे. मात्र, सर्वच ग्राहकांना आतापर्यंत या सेवेचा लाभ मिळालेला नाही. अशात आता Reliance Jio ने 5.5G सर्व्हिस सुरू केली आहे. या नेटवर्कला 5G Advance म्हटले जात आहे. रिलायन्स जिओची ही नवीन सर्व्हिस नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊया.
5.5G नेटवर्क काय आहे?
5.5G ला सध्याच्या 5जी नेटवर्कचे आधुनिक व्हर्जन म्हटले जात आहे. या सर्व्हिसला 5जी च्या आधारावर तयार करण्यात आले असून, याचा उद्देश हाय-स्पीड डेटा, जास्त कव्हरेज आणि अपलिंक कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणे हा आहे. मल्टी कॅरियर एग्रीगेशनच्या मदतीने ग्राहकांना 5.5जी नेटवर्कवर 10Gbps पर्यंत मॅक्सिमम डाउनलिंक स्पीड आणि 1Gbps ची अपलिंक स्पीड मिळेल.
5.5जी सेवेचा वापर वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रातील ग्राहकांना करता येणार आहे. जगभरात अशाप्रकारची सेवा उपलब्ध करणाऱ्या इतरही कंपन्या आहेत. मात्र, भारतात अशाप्रकारची सेवा सुरू करणारी जिओ ही पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे.
यूजर्सला काय फायदा मिळणार?
Jio 5.5G नेटवर्क मल्टी सेल कनेक्टिविटीसह लाँच करण्यात आले आहे. म्हणजेच, तुम्ही एकाचवेळी वेगवेगळ्या नेटवर्क सेलशी कनेक्ट होऊ शकता. यामुळे हाय-स्पीड इंटरनेट वापरता येईल. ज्या भागामध्ये नेटवर्क कंजेकशनची समस्या येते, अशा ठिकाणी या टेक्नोलॉजीचा सर्वाधिक फायदा होईल. विविध व्यावसायिक क्षेत्राला देखील याचा फायदा मिळणार आहे.
5जी नेटवर्कचा कसा लाभ घेता येईल?
बहुतांश नवीन स्मार्टफोन्समध्ये 5जी नेटवर्क आधीपासूनच सुरू असते. मात्र, काही फोन्समध्ये या सर्व्हिसचा फायदा घेण्यासाठी सेटिंग्समध्ये बदल करावा लागतो. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन नेटवर्कमध्ये बदल करावा लागेल.
सेटिंग्समध्ये गेल्यावर तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिसतील. यातील Preferred Network Type पर्याय निवडा. तुम्हाला 5जी सेवेचा लाभ घेण्यासाठी 5G/4G/3G/2G (ऑटो) हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुमच्या भागामध्ये 5जी नेटवर्क उपलब्ध असल्यास तुम्ही हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.





