जिओने रचला इतिहास, जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात मिळणार 5G नेटवर्कचा लाभ; सैनिकांना होणार फायदा

Reliance Jio 5G Network: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या 4G आणि 5G सेवेचा लाभ घेणारे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वाधिक ग्राहक जिओचेच आहेत. आता जिओने 4G और 5G नेटवर्क सेवेबाबत इतिहास रचला आहे. जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात 5जी नेटवर्क सेवा उपलब्ध करण्याची कामगिरी जिओने केली आहे.
जिओने भारतीय सैन्यासोबत मिळून सियाचिन ग्लेशियरमध्ये 4G आणि 5G नेटवर्क सेवा उपलब्ध केली आहे. यामुळे आता हजारो फूट उंचीवर असलेल्या भारतीय सैनिकांना देखील सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा लाभ मिळणार आहे. जिओ आणि भारतीय सैन्याने सियाचिन ग्लेशियरमध्ये यशस्वीरित्या पहिला 5G टॉवर उभारण्याची कामगिरी केली आहे.
15 जानेवारीला सैन्य दिन साजरा केला जातो. त्याआधी सियाचिनमध्ये सुपरफास्ट इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याची कामगिरी जिओने केली आहे. जगातील सर्वात उच्च युद्धक्षेत्रात इंटरनेट सेवा पोहोचवण्याची कामगिरी करणारी जिओ ही पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे.
याबाबत माहिती देताना सैन्याने सांगितले की, ही कामगिरी आमच्या शूर सैनिकांना समर्पित आहे. सैनिकांनी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही हे काम पूर्ण केले. यामुळे आता भारतीय सैन्यांच्या तांत्रिक क्षमतेला अधिक प्रोत्साहन मिळेल. तसेच, सैनिकांना दळणवळणाच्या सुविधेचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकेल. 5G कनेक्टिव्हिटी सैनिकांना त्यांच्या ऑपरेशन्समध्ये अधिक उपयुक्त ठरेल.
एवढ्या उंचीवर टॉवर बसवणे हे आव्हानात्मक काम होते. जिओने या सेवेसेठी स्वदेशी फुल-स्टॅक 5जी तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. या भागामध्ये अनेकदा -40°C पर्यंत तापमान असते.





