कोयना धरणातून ३०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा
Updated On:

कोयनानगर – कोयना धरणातून आज दि. २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक्स आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





