Rajukmar Rao : राजकुमार रावच्या ‘टोस्टर’ चित्रपटाची रिलीज डेट समोर; ‘या’ मराठी कलाकाराची असणार विशेष भूमिका
Rajukmar Rao : अभिनेता राजकुमार राव टोस्टर या नवीन चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Rajukmar Rao : अभिनेता राजकुमार राव नेहमी त्याच्या चाहत्यांना काहीतरी नवं देण्याचे काम त्याच्या चित्रपटातून करत असतो. तो आगामी ‘टोस्टर’ या कॅामेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर समोर आला होता.
टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. अखेर चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॅार्मवर रिलीज करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटात राजकुमारसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. Rajukmar Rao
हा चित्रपटात 15 एप्रिल या दिवशी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर रिलीज होणार असून, निर्मात्यांनी याबद्दचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमार राव असून, त्याने आपला ‘टोस्टर’ हा चित्रपट 15 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर येत असल्याची घोषणा केली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल आणि उर्वरित कलाकारांविषयीही त्याने माहिती दिली आहे. या चित्रपटात राजकुमार रावने रमाकांत नावाच्या एका कंजूष व्यक्तीची भूमिका साकारली आहे. कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी म्हटले आहे, “ही एक सुपर-टोस्टी कॉमेडी असणार आहे.”
व्हिडिओमध्ये राजकुमार रावला एक मोनोलॉग (एकपात्री संवाद) सादर करण्यास सांगितले जाते आणि त्याला एक स्क्रिप्ट दिली जाते. मात्र, राजकुमार म्हणतो की प्रत्येक वेळी मोनोलॉग सादर करणे आवश्यक नाही. त्यामुळे तो व्हिडिओतून फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि कलाकारांविषयी संपूर्ण माहिती देतो.
व्हिडिओच्या माध्यमातून राजकुमारने पत्नी पत्रलेखासोबत चित्रपटाची निर्मिती केली असल्याची माहिती शेअर केली आहे.
एक दमदार स्टारकास्ट Rajukmar Rao

राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या व्यतिरिक्त फराह खान, अभिषेक बॅनर्जी, अर्चना पुरण सिंग, सीमा पाहवा आणि जितेंद्र जोशी अशी दमदार कास्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक दास चौधरी यांनी केले आहे. चाहते राजकुमारला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





