राजकुमार रावच्या लेकीचं नाव ठरलं! फोटो शेअर करत दाखवली पहिली झलक

Rajkumar Rao Baby Name | बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी चाहत्यांना आनंदची बातमी दिली होती. राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता.
आई-बाबा झाल्यानंतर राजकुमार आणि पत्रलेखा यांनी “आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका गोड सुंदर मुलीच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त देवाने दिलेला हा मोठा आशीर्वाद आहे,” असे पोस्टमध्ये म्हंटले होते. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
मात्र तेव्हापासून राजकुमार आणि पत्रलेखाचे चाहते त्यांच्या छोट्या परीची एक झलक कधी पाहायला मिळेल याची वाट पाहत होते. याशिवाय तिच्या नावाचीही त्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांचीही प्रतिक्षा संपली आहे. राजकुमार आणि पत्रलेखाने आज एका स्पेशल पोस्ट सह बाळाची हलकी झलक दाखवत तिचे नाव जाहिर केले आहे.
View this post on Instagram
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या मुलीला हात हातात घेऊन एक फॅमिली फोटो शेअर केला. सोबतच तिचे नाव काय ठेवले हे देखील शेअर केले. त्यांनी लिहिले की “हात जोडून आणि मनापासून, आम्ही तुम्हाला आमच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची ओळख करून देतो.” त्यांनी पुढे मुलीचे नाव “पार्वती पॉल राव” ठेवल्याचे जाहिर केले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी मुलीचा चेहरा उघड केला नाही. Rajkumar Rao Baby Name |
राजकुमार राव आणि पत्रलेखा 15 नोव्हेंबर 2021 रोजी चंदीगडमध्ये विवाहबंधनात अडकले होते. मिडिया रिपोर्टनुसार, लग्नाआधी तब्बल 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. 2010 मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. पत्रलेखा आणि राजकुमार राव 2014 मध्ये आलेल्या ‘सिटिलाइट्स’ या फिल्ममध्ये एकत्र झळकले होते. Rajkumar Rao Baby Name |
राजकुमार राव सध्या नेटफ्लिक्सच्या ‘टोस्टर’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अविनाश अरुण दिग्दर्शित एका कोर्टरूम ड्रामा बायोपिकमध्येही झळकणार आहे. Rajkumar Rao Baby Name |
हेही वाचा :
“कधीच माफ करणार नाही, तु कसा बाप आहेस”; गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा संतापली





