Udta Teer Movie: आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल, नवी तारीख समोर
Udta Teer Movie: आयुष्मानसोबत सारा अली खानची जोडी पाहायला मिळणार

Udta Teer Movie: अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी ‘उडता तीर’ या चित्रपटात आयुष्मानसोबत सारा अली खानची जोडी पाहायला मिळणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘उडता तीर’ ‘च्या प्रदर्शनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आता ‘उडता तीर’ या सिनेमाला आता नवी रिलीज डेट मिळाली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. निर्मात्यांनी आधी हा चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यात आता बदल करण्यात आला आहे. Udta Teer Movie
‘उडता तीर’ या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन आकाश ए. कौशिक यांनी केलं असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. करण जोहर, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचीन जैन हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
सारा आणि आयुष्मानची केमिस्ट्री पहिल्यांदाच मुख्य जोडीत दिसणार
या सिनेमाच्या निमित्ताने सारा आणि आयुष्मान ‘पती पत्नी और वो दो’ नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत.
पण तिथे आयुष्मान आणि वामिका पती-पत्नीची भूमिका साकारत होते अन् सारा आयुष्मानच्या पात्राची ऑन-स्क्रीन मैत्रीण बनली होती. आता मात्र दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदाच मुख्य जोडी म्हणून दिसेल.
दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला अक्षय कुमार आणि सैफ अली खान स्टारर ‘हैवान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘हैवान’ सोबत होणारा क्लॅश टाळण्यासाठी ‘उडता तीर’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याचेही म्हंटले जात आहे. Udta Teer Movie
हेही वाचा:






