Panchayat 5 : ‘पंचायत’ सीझन ५’ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावची रंजक कहाणी पुन्हा पाहता येणार
Panchayat 5 : दीपक कुमार मिश्रा पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार

Panchayat 5 : अखेर ‘पंचायत’ सीझन ५’ याचवर्षी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी मेकर्सने पंचायत 5 साठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सांगितल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता याची अधिकृतरित्या रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
पुढील महिन्यात ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर ‘पंचायत ५’ रिलीज होणार आहे. अमेझॉन प्राइमवर हा सीझन पाहता येणार आहे. ‘पंचायत’च्या नव्या सीझनमध्ये गावातील राजकारण, संघर्ष पाहायला मिळणार आहे.
फुलेराला आता नवे मुखिया मिळाले आहेत, त्यामुळेच नवे प्रधानपती बनलेल्या बनराकसने सचिवजींना त्रास देण्यासाठी नेमका काय प्लॅन केला, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यात सत्तेतील बदलासोबतच फुलेरामध्ये नवीन प्रतिस्पर्धी आणि बदलती समीकरणे देखील पाहायला मिळतील.
View this post on Instagram
याशिवाय ‘पंचायत ५’ मध्ये सचिवजी आणि रिंकीची प्रेमकहाणी पुढे सरकताना दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फुलेरा गावची रंजक कहाणी पाहता येणार आहे.
दीपक कुमार मिश्रा पुन्हा एकदा या नवीन सीझनच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणाभ कुमार यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवर, फैसल मलिक, चंदन रॉय, संविका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे प्रमुख कलाकार पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
Supriya Pilgaonkar: सुप्रिया पिळगांवकर ‘तू आहेस ना’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस





