Rekha | Shabana Azmi : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा ७५ वर्षीय वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेखा देखील या पार्टीला उपस्थित होत्या. सध्या सोशल मीडियावर शबाना आझमी यांच्या वाढदिवसाची पार्टीतील व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यात माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन, रेखा आणि शबाना आझमी तुफान डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रेखा ‘कैसी पहेली जिंदगानी’ गाण्यावर माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन आणि शबाना आझमी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी रेखा यांच्या लूकचे, डान्सचे नेटकरी कौतुक करत आहे. 70 वर्षांच्या रेखा यांची एनर्जीचे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. रेखा यांनी काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टायलिश जॅकेट परिधान केले आहे. डोक्यावर कॅप आणि सनग्लासेसमध्ये त्या खुपच सुंदर दिसत आहे. फॅशन आणि डान्समध्ये त्यांनी माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांना मागे टाकले आहे. यावेळी माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर आणि विद्या बालन यांनी देखील खास लुक केला होता.