Rekha। Raj Kapoor : 14 डिसेंबर 1924 रोजी ‘राज कपूर’ यांचा जन्म झाला. यंदाचं वर्ष हे या शोमनच्या जन्मशताब्दीचं वर्ष होत. त्यांनी आपल्या आयुष्याच्या घटनांवर अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ आयुष्यदेखील जगले. ‘शो’मॅन राज कपूर म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न. निळ्याशार डोळ्यांचा, विलक्षण प्रतिभा असणारा, दूरदृष्टी असणारा, संवेदनशील आणि अफाट अभिनयक्षमता, निर्मिती-दिग्दर्शनाचे कौशल्य असणारा जगावेगळा कलावंत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेते, चित्रपट निर्माते असणार्या राज कपूर यांनी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान खूपच अमूल्य आहे. नुकतंच मुंबईत कपूर फॅमिलीने राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष साजर केलं. या कार्यक्रमात संपूर्ण कपूर परिवाराशिवाय चित्रपट इंडस्ट्रीतील तमाम बडे कलाकार उपस्थित होते. राज कपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे अनेक क्लासिक चित्रपट दाखवण्यात आले होते. यावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री ‘रेखा’ यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. यावेळी रेखा भावूक झालेल्या दिसल्या राज कपूर यांच्या पोस्टरसमोर अश्रू पुसत त्यांनी हात जोडून नमस्कार केला. त्यांचा हा व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमातील हा सर्वात भावनिक आणि लक्षवेधी क्षण होता. या भावनिक क्षणी अभिनेत्री आलिया भट्टने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासोबत काही फोटोज सुद्धा क्लिक केले. यावेळी आलिया पांढऱ्या साडीत खूप सुंदर दिसत होती. राज कपूर यांचा वारसा लक्षात ठेवताना रणबीर कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि आलिया भट्ट यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही या कार्यक्रमात उपस्थित होते. राज कपूर यांचे काही गाजलेले चित्रपट: आग (1948), बरसात (1949), आवारा (1951) , श्री 420 (1955), जगते रहो (1956), जिस देश में गंगा बेहती है (1960), संगम (1964), मेरा नाम जोकर (1970 ), बॉबी (1973), राम तेरी गंगा मैली (1985) असे सुपरहिट चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत.