Rekha Ambure : बीडच्या राजकारणात खळबळ ! नगरसेविका रेखा अंबुरेंचे कुणबी प्रमाणपत्र रद्द
बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरे (Rekha Ambure) यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. बनावट पुरावे सादर करून प्रमाणपत्र मिळवले होते, याबाबतची तक्रार विरोधी उमेदवाराने दिली होती.

Rekha Ambure : बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरे (Rekha Ambure) यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. बनावट पुरावे सादर करून प्रमाणपत्र मिळवले होते, याबाबतची तक्रार विरोधी उमेदवाराने दिली होती.
बनावट कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून नगरपालिकेची निवडणूक लढवून वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा अंकुश अंबुरे-सरवदे (Rekha Ambure) या नगरसेवक बनल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी रद्द करून जप्त केले. त्यांनी मौजे कुप्पा येथील सावंत आडनावाच्या वंशावळीतील नाव सारखे असल्याचा फायदा घेत, खापर पंजोबाच्या समान नावाचा आधार घेत प्रशासनाची दिशाभूल केली होती.
नमुना क्रमांक 33 व 34 मधील कुणबी नोंदींचा आधार घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र (Rekha Ambure) मिळवण्यात आले होते. मात्र, मौजे कुप्पा येथील यशवंत सावंत यांच्या रक्तसंबंधातील वारसांनी 1967 पूर्वीचे शेतपुस्तक, प्रतवारी पुस्तक, पाहणी पत्रके, हिस्सा फॉर्म आदी महसुली पुरावे सादर करून स्वतःचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवले असल्याचे पडताळणी समितीसमोर स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांनी याच मूळ नोंदींच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान या प्रकरणावर सुमन माणिकराव मुंडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला होता.






