द्वेष नाकारा… मानवतावादी ऑस्कर स्वीकारताना टेलर पेरी यांची भावना

वॉशिंग्टन : द्वेष नाकारा आणि काठावर असणाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अधिक कठोर परीश्रम करा, असा सल्ला जीन हरशोल्ट मानवतावादी पुरस्कार स्वीकारताना टेलर पेरी यांनी दिला. 93 व्या वार्षिक अकादमी पुरस्कार (ऑस्कर) सोहळ्यात ते बोलत होते.
1960 च्या दशकात अल्बामा बॉम्बिंग आणि इमेट टिल यांच्या हत्येच्या अत्यंत अस्वस्थ काळात मिसिसीपीमध्ये हलाखीचे जीवन जगत असताना आईने दिलेल्या शिकवणुकीचा धडाच त्यांनी यावेळी उपस्थितांना घालून दिला. मोटारीच्या बाहेर झोपत दिवस काढणाऱ्या पेरी यांचा अटलांटा येथे आज मोठा स्टुडिओ आहे, या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
ते म्हणाले, तीने (आईने) मला द्वेष आणि झापडबंद न्याय नाकारायला शिकवले. सध्याच्या इंटरनेट, समाज माध्यम कार्यपध्दतीच्या सध्याच्या काळात आपल्या एका विशिष्ट पध्दतीनेच विचार करायला हवे असते. 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या पाहून मला वाटते आपण मुलांना द्वेष नाकारायला शिकवायला हवे. कोणाचाच द्वेष करू नका, हे सांगताना त्यांचा आवाज भरून आला होता.
ते मेक्सिकन आहेत किंवा ते काळे अथवा गोरे आहेत म्हणून मी कोणाचा द्वेष करायला नकार देतो. ते पोलिस अधिकारी आहेत किंवा आशियाई आहेत, म्हणून मी त्यांचा द्वेष करायला नकार देतो. हा मानवतावादी पुरस्कार मला स्वीकारायला हवा आणि यात मध्ये उभे राहणाऱ्याला तो द्यायला हवा. कारण तेथे मलमपट्टी आहे, संवाद आहे आणि बदलाची सुरवात आहे. जर मध्ये उभे राहून मला द्वेष आणि झापडबंद निर्णय नाकारताना पहायचे असेल तर हे तुम्हालाही लागू आहे, असे ते म्हणाले.
अटलांटा येथून या सोहळ्याला संबोधित करताना त्यांनी 17 वर्षापुर्वीच्या एका घटनेला उजाळा दिला. त्यावेळी ते काम करत असलेल्या एका प्रकल्पाच्या इमारतीबाहेर उभ्या असलेल्या महिलेला भेटले होते. त्याची आठवण सांगताना ते म्हणाले, “” मी त्या महिलेला पैसे देऊ केले. ती म्हणाली, सर तुमच्याकडे एखादी चप्पल आहे का? त्यामूळे माझी थंडी थांबू शकेल. माझ्याकडे चपलेचा एक जोड होता. तो टाचेवर काहीसा झिजला होता. मग मी कपाटाकडे गेलो. तेथे अनेक बॉक्स होते, कपड्यांचा ढिग होता. आम्ही जेथे उभे होतो तेथे अनेक चपला होत्या. त्या तीला दाखवल्या. त्यातील एक तिला बसली. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली थॅंक्स जेसस.. त्यामुळे माझे पाय पुन्हा जमिनीवर आले.





