हिंदीबाबत रेहमानने दिले स्पष्टीकरण, म्हणाला…
Updated On:

पुणे – काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हिंदी न बोलण्यावरून ए आर रहमान बाबत एक वाद निर्माण झाला होता. कार्यक्रमाच्या निवेदिकेने हिंदी बोलायला सुरुवात केल्यावर रेहमान स्टेजवरून निघून गेला होता.
त्यावरून रहमान हिंदी भाषेचा द्वेष करतो अशी टीका झाली होती. त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपण तीन भाषांमधील गाण्यांवर काम करत होतो. हिंदीचे गाणे अगोदर झालेले होते.
आम्ही तामिळनाडूत आलो होतो. त्यामुळे तमिळ कलाकारांना स्टेजवर येण्यास संधी मिळावी म्हणून आपण निघून गेल्याचे रहमानने सांगितले. हिंदीचा द्वेष करण्याचा काही संबंध नाही.
आपल्याला हिंदीपेक्षा तमिळ अधिक चांगले समजत असल्याने निवेदिकेला हिंदीबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. एवढेच कारण होते असे रेहमानने सांगितले.





