Reel Star Rohini Paradhye : रिलस्टार रोहिणीच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; स्मशानभूमीतच दोन कुटुंबांत वाद, नेमकं काय घडलं?
Reel Star Rohini Paradhye : सोशल मीडियावर आपल्या रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.

Reel Star Rohini Paradhye : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवे तपशील समोर येत आहेत. या घटनेचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, रोहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर झालेल्या एका घटनेमुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे. (Reel Star Rohini Paradhye)
स्मशानभूमीतच वादाची ठिणगी
रोहिणीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या माती सावडण्याच्या कार्यक्रमासाठी तिचे आणि पती निलेश पाराध्ये यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात कार्यक्रम सुरू असताना काही नातेवाईकांमध्ये अचानक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. (Reel Star Rohini Paradhye)
सुरुवातीला उपस्थितांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढल्याने काही काळ स्मशानभूमीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Reel Star Rohini Paradhye)
पोलिस तपासाला वेग
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिसांनी शुक्रवारी पाराध्ये कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच इतर नातेवाईकांचे जबाबही नोंदवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Reel Star Rohini Paradhye)
तपासाच्या पुढील टप्प्यात रोहिणी आणि निलेश यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मागवण्यात आले आहेत. या अहवालातून मृत्यूपूर्वीच्या संपर्कांबाबत आणि इतर काही महत्त्वाच्या बाबींबाबत माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Reel Star Rohini Paradhye)
Reel Star Rohini Paradhye : रिलस्टार रोहिणीच्या मृत्यूनंतर दुसरी बाजू समोर; खळबळजनक खुलासा
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील त्यांच्या हॉटेल ग्रामपंचायतमध्ये रोहिणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. घटना घडली त्यावेळी निलेश हॉटेलच्या बाहेर बसलेले होते, तर रोहिणी आत किचनमध्ये होती, अशी माहिती समोर आली आहे. (Reel Star Rohini Paradhye)
रोहिणी आणि निलेश हे सोशल मीडियावर लोकप्रिय जोडपे म्हणून ओळखले जात होते. दोघेही विविध विषयांवर रिल्स तयार करत असत. प्रेमविवाहानंतर त्यांनी हॉटेल व्यवसाय उभा केला आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली होती. (Reel Star Rohini Paradhye)
मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट
रोहिणीच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय आहे, व्यवसायातील तणाव होता की अन्य काही कारण, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून तपास अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. (Reel Star Rohini Paradhye)
दरम्यान, या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Reel Star Rohini Paradhye)





