रील काढणे जीवावर बेतले; CA अन् सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा २५० फूट खोल दरीत कोसळून ‘मृत्यू’

पावसाळ्यात सर्वच लोक फिरायला बाहेर निघतात. अशात पावसाळ्यात अनेक दुर्घटना सुद्धा घडतात. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परीसरात घडला आहे. या दुर्घटनेत व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्वी कामदारला आपला जीव गमवाला लागला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, चार्टर्ड अकाऊंटंट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अन्वी कामदार मुंबईच्या माटुंगावरुन 6 मित्रांसोबत माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परीसर फिरायला गेली होती.
यावेळी धबधब्याजवळ सेल्फी आणि घेण्याच्या नादात अचानक तिचा तोल घसरला ती २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेनंतर तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियातून तिने रील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. या घटनेने कुटूंबियांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. अन्वीच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





