Reel to Real अक्षया देवधर-हार्दिक जोशी अडकले विवाहबंधनात

मुंबई – तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील रानदा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज विवाह बंधनात अडकले आहेत. मालिकेमध्ये या जोडीला चाहत्यांनी जितकं प्रेम दिल तितकच प्रेम यांना एकत्र आल्यानंतर चाहते देताना दिसत आहेत. रानदा आणि पाठक बाकी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहते भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आज पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला. मेहंदी,हळदी,संगीत अशा विविध कार्यक्रमांनंतर हा विवाह सोहळा पडल्याचे समजते. दोघांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नामध्ये दोघेही आकर्षक पोषाखामध्ये पाहायला मिळाले. यावेळी अक्षयाने लाल रंगांची नऊवारी साडी परिधान केली होती. त्यासोबतच तिने घातलेले दागिने जणू सगळ्यांच लक्ष तिच्याकडे वेधून घेत होते. तर हार्दिकने क्रीम रंगाचा कुर्ता आणि त्यावर लाल रंगाचं धोतर परिधान केलं होत.
View this post on Instagram
“रील टू रिअल..जादू कायम ” अशा कॅप्शनखाली अक्षयाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सिने कलाकारांसह चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी या दोघांनाही पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





