लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्याने राणादाची पाठकबाईंसाठी खास पोस्ट

Hardeek Joshi Post For AKshaya Deodhar | झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरची जोडी लोकप्रिय ठरली. खऱ्या आयुष्यात देखील या जोडीने एकमेकांना साथ दिली. राणादा आणि पाठकबाई म्हणून या जोडीला घराघरात ओळख मिळाली.
या दोघांनी डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. नुकतेच त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्त हार्दिकने अक्षयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. त्याने पोस्ट करत लिहिले की, ‘ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्यादिवशी मी लग्नानंतर आपलं आयुष्य इतकं सुंदर असू शकेल याचा विचारही केला नव्हता. तू माझी जीवनसाथी आहेस आणि सगळ्यात जवळची मैत्रीणसुद्धा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कायम आणि नेहमी राहील. तुला आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’ त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीकडेच हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसला होता. तर अक्षया ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत दिसणार आहे. तिने स्वतःचा साड्यांचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. त्यामुळे अभिनयासह तिने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
हेही वाचा:





