“तू माझ्या आयुष्यातील..”; अभिनेत्री अक्षया देवधरच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीची खास पोस्ट

Hardik Joshi And Akshaya Deodhar| अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मालिकेतील या जोडीने खऱ्या आयुष्यातही एकत्र येत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यातच आता हार्दिक जोशीने पत्नी अक्षया देवधरच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक व त्यांच्या मित्रमंडळींनी अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज प्लॅन केले होते. यानिमित्त घराची सजावट करत 30 अंक असलेला खास केकही कापण्यात आला. यानंतर त्याने अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या अद्भूत आणि सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
View this post on Instagram
“तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सर्वात खास व्यक्ती आहेत. तुझ्याशिवाय एक दिवसही कसा जाईल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मला आशा आहे की, यापुढील वर्ष देखील आपल्या आयुष्यात नवनवीन रोमांच घेऊन येतील. हॅप्पी बर्थ डे माय लाइफ पार्टनर…”, असेही हार्दिकने म्हंटले आहे. हार्दिकच्या या रोमँटिक पोस्टवर अक्षयाने कमेंट करत “आय लव्ह यू…”म्हंटले आहे.
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानच हार्दिक आणि अक्षयाचे प्रेम झाले आणि त्यांनी मागील वर्षी 2 डिसेंबर रोजी विवाह केला. त्यानंतर सध्या हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनय करत आहे.





