पुढील चार दिवस राज्यात रेड अलर्ट; कोकणात अतिवृष्टीचा इशारा तर ‘या’ जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट

मुंबई : यंदा मान्सून चांगलाच लांबला असून जूनचे तीन आठवडे कोरडे गेले. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने राज्यात एंट्री केली. दरम्यान, मधल्या काळात काही वेळ विश्रांती घेऊन पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुढील ३ ते ४ दिवस राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे. पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊनच कामाचे नियोजन विभागाकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान गेली चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहरांना ओलंचिंब केले आहे.
5 Jul: IMD ने आज महाराष्ट्रासाठी पुढील 4, 5 दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३,४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी.खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय
कृ IMD कडील माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/tXh9kIpdCE— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2023
दरम्यान, “भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ दिवसांसाठी तीव्र हमानाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा. खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय. कृपया भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या”, असे ट्वीट हवामान विभागाने यांनी केले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत असून यापुढेही हवामान खात्याच अंदाज घेऊन कामाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे.





