Gold and silver prices: सोने-चांदीचा नवा विक्रम! सोनं 2600 तर चांदी 3000 रुपयांनी वाढली, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold and silver prices: जागतिक भू-राजकीय अनिश्चितता आणि अमेरिकी सरकारच्या दीर्घकालीन बंदमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. बुधवारी राजधानी दिल्लीत १० ग्रॅम सोन्याचा भाव २,६०० रुपयांनी वाढून १,२६,६०० रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही २,६०० रुपयांनी वाढून १,२६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीत ३,००० रुपयांची वाढ होऊन ती १,५७,००० रुपये प्रति किलोग्रॅम (सर्व करांसह) या विक्रमी स्तराच्या जवळ पोहोचली आहे. अखिल भारतीय सराफा संघाने याची पुष्टी केली आहे.
गेल्या तीन दिवसांत सोन्यात ६,००० रुपयांची वाढ –
गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ६,००० रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर जोखीम टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळले आहेत. विश्लेषकांच्या मते, अमेरिकी सरकारचा बंद आणि वाढता भू-राजकीय तणाव यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतींना आधार मिळाला आहे.
सुरक्षित गुंतवणुकीला पाठबळ –
जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, पुढील काळातही ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.




