Maharashtra Politics | काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केलेल्या गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण आले आहे. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते’, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यावर संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शंकांचे निरसन करणे, निवडणूक आयोगाची जबाबदारी “अलिकडच्या काळातील निवडणुका खूप संशयास्पद होत आहेत. अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे मांडले त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. हरियाणा पुन्हा भाजपकडे जाते, हे कसे होऊ शकते? शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत, शंकांचे निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही,” असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्याही या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे’ “शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील, तर ईव्हीएमसंदर्भातही प्रश्न निर्माण होतो. मतदानावर लोकशाही चालते, त्या मतदानावरच शंका निर्माण होत असेल तर ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणं, अत्यंत गरजेचं आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्व दूर जनतेच्या मनात आहे, निवडणूक आयोगानेच लोकशाहीचा खात्मा करायचा ठरवले आहे. त्यामुळे भविष्यात जनतेने हा विषय हातात घेणे गरजेचे आहे,’ असं यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. Maharashtra Politics | ‘शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाला’ ‘माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाशी संबध आहेत. असे असतानाही माझा पराभव होतो, हे आश्चर्यकारक आहे. माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदवले गेले. परंतु आयोगाने त्याची दखल घेतली नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात असाच मतदार नोंदणी घोटाळा झाला. संगमनेर मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगाकडे मागितलेली माहिती दिली नाही,’ असा आरोप त्यांनी केला. Maharashtra Politics | हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती…