आरोग्य सेवेचे वास्तव समोर: कोल्हापूरमधील ‘या’ रुग्णालयाला अचानक भेट, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर काय म्हणाले?

Health Minister Prakash Abitkar : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय अर्थात ईएसआयसी या ठिकाणी अचानक भेट दिली. यावेळी इथले आरोग्य सेवेचे वास्तव समोर आले आहे. आरोग्य मंत्र्यांचा रुग्णालयाला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
५ जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या रुग्णालयात केवळ ३० बेड असलेली सुविधा सुरू असल्याने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यासमोरच शाब्दिक बचाबाची सुरू होती. या संपूर्ण प्रकारावर आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या वैद्यकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी इथे सुरू असलेली आरोग्य सेवा याची पाहणी केली. तसेच रुग्णांना योग्य सेवा मिळते का याची माहिती घेतली. रुग्णालयातील चित्र हे समाधनकारक नसल्याचे त्यांना दिसले. यावेळी आरोग्यमंत्र्यांसमोरच दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यामुळे चांगलाचा गोंधळ उडाला होता. शेवटी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या.
या रुग्णालयातील पाहणी केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आठवड्याभरात केंद्राच्या अधिकाऱ्यांसबोत बैठक बोलावली आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे एका बाजूला चांगले काम होत आहे. कामगार विमा निगमकडून अनेक हॉस्पिटल चालवली जातात. कोल्हापुरातील हे हॉस्पिटल कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यातील दहा लाख कामगारांसाठी आहे. हॉस्पिटलमध्ये 30 बेडही उपलब्ध नाहीत. हे निराशाजनक चित्र असल्याचे म्हणत आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली.





