satara | आमदार मकरंद पाटील सूचनेनंतर भुईंज बसस्थानकाचे पुन्हा डांबरीकरण

भुईंज, (प्रतिनिधी) – निकृष्ठ दर्जाच्या कामाची तक्रार होताच आमदारांच्या आदेशानंतर भुईंज बसस्थानकाचे पुन्हा झाले डांबरीकरण विकासकामे दर्जेदार होण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी लक्ष घालण्याच्या आमदार मकरंद पाटील यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचना केल्या.
भुईंज बसस्थानकात आमदार मकरंद पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रूपये खर्चाचे डांबरीकरण करण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळयापूर्वीच हे डांबरीकरण खचल्याने व खड्डे पडल्याने सदरचे काम निकृष्ठ झाल्याची तकार ग्रामस्थांनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली होती.
यावेळी भुईज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार यांच्याकडे आमदारांनी जवाबदारी सोपवत अशी कामे तातडीने पुन्हा करून घेत यापुढे प्रत्येक कामात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेली कामे दर्जात्मक व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करून भुईंज बसस्थानकातील डांबरीकरणाचे ठेकेदार यांना डांबरीकरण पुन्हा करण्याच्या सुचना केल्या.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी ठेकेदार यांनी हे काम पूर्ण केले. उपसरपंच शुभम पवार ग्रामपंचायत सदस्य अमीत लोखंडे, चेतन दाभाडे, वस स्थानक नियंत्रक दिपक तरडे युवा नेते संजय लोहार आदींनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.





