RCB vs SRH : आरसीबीचं ऐतिहासिक ‘मिशन चेस’! १५.४ ओव्हरमध्येच संपवला खेळ; विराट-पडिक्कलने हैदराबादला फोडला घाम
RCB vs SRH : आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ६ गडी राखून पराभव केला आणि १९० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत नवा विक्रम प्रस्थापित केला.

RCB vs SRH Royal Challengers Bengaluru beat Sunrisers Hyderabad : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने ऐतिहासिक कामगिरी करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ६ गडी राखून पराभव केला आणि १९० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने अशक्य वाटणारा विजय सुकर केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ९ बाद २०१ धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले होते. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी अवघ्या १५.४ ओव्हरमध्येच २०३ धावा कुटून हे लक्ष्य गाठले. आरसीबीच्या आयपीएल इतिहासात हैदराबादविरुद्ध १९० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
𝐂𝐚𝐮𝐭𝐢𝐨𝐧: Chase Master at Work ⚠️
Virat Kohli brings up his 6️⃣4️⃣th #TATAIPL half-century 👏
Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #TATAIPL | #KhelBindaas | #RCBvSRH | @RCBTweets | @imVkohli pic.twitter.com/juU4F6f6tn
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
इशान किशनची झुंजार खेळी व्यर्थ –
Innings Break!
A solid knock from Captain Ishan Kishan powers #SRH to 2⃣0⃣1⃣ 🎯#RCB‘s chase on the other side ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #TATAIPL | #KhelBindaas | #RCBvSRH pic.twitter.com/2ihrALlHj2
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादसाठी कर्णधार इशान किशनने ३८ चेंडूत ८० धावांची (८ चौकार, ५ षटकार) स्फोटक खेळी केली. अनिकेत वर्मा (४३ धावा) आणि हेनरिक क्लासेन (३१ धावा) यांनी त्याला चांगली साथ दिली. मात्र, आरसीबीच्या जेकब डफी (३ विकेट्स) आणि रोमेरियो शेफर्ड (३ विकेट्स) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
पडिक्कलचा ‘इम्पॅक्ट’ आणि कोहलीचा क्लास –
Century stand. Match won. Job done! ✅
A masterclass in chasing from @imVkohli and @devdpd07 🤝
Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #TATAIPL | #KhelBindaas | #RCBvSRH | @RCBTweets pic.twitter.com/YWAO7Scjq2
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
आरसीबीचा पाठलाग सुरू झाल्यावर जेकब डफीच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरलेल्या देवदत्त पडिक्कलने सामन्याचे चित्र पालटले. पडिक्कलने अवघ्या २६ चेंडूत ६१ धावांची (७ चौकार, ४ षटकार) तुफानी खेळी केली. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने ३८ चेंडूत नाबाद ६९ धावा ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
विराटच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. कर्णधार रजत पाटीदारनेही १२ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. आरसीबीने इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अवघ्या १५.४ ओव्हरमध्ये पूर्ण केल्यामुळे त्यांच्या ‘नेट रनरेट’ही मजबूत झाला आहे.





