RCB vs PBKS Final : किंग कोहलीचा फायनलमध्ये विक्रमांचा धमाका; पोलार्ड-रोहितला टाकले मागे!

RCB vs PBKS Final Virat Kohli surpasses Pollard-Rohit : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पंजाब किंगजला १९१ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीसाठी सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. दरम्यान या खेळीच्या जोरावर विराटने रोहित-पोलार्डचा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीने पोलार्डला टाकले मागे –
या सामन्यात आरसीबीच्या एका टोकाकडून विकेट्स पडत होत्या, पण विराट कोहलीने दुसरे टोक सांभाळले. ज्यामुळे संघाने १४ षटकांत आरसीबीचा स्कोअर १२५ धावांवर नेला. त्याच षटकात कोहलीने ३८ वी धाव काढताच टी-२० क्रिकेटमध्ये एक नवीन टप्पा गाठला. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत किरॉन पोलार्डच्या पुढे गेला. किरॉन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये १३५३७ धावा केल्या आहेत.
Virat Kohli has been consistent in finals, but the big one has just stayed out of reach.#IPL2025Final #IPL2025 #RCBvsPBKS #IPLFinal #ViratKohli #CricketTwitter pic.twitter.com/zqUrR2kdHR
— InsideSport (@InsideSportIND) June 3, 2025
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- ख्रिस गेल – १४५६२
- अॅलेक्स हेल्स – १३६९८
- शोएब मलिक – १३५७१
- विराट कोहली – १३५४३
- किरॉन पोलार्ड – १३५३७
हेही वाचा – RCB vs PBKS Final : विराट कोहलीने फायनलमध्ये रचला नवा इतिहास, मोडला शिखर धवनचा खास विक्रम
विराटने रोहित शर्माला टाकले मागे –
किरॉन पोलार्डला मागे सोडल्यानंतर लगेचच पुढच्याच षटकात विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नसेल पण टी-२० क्रिकेटच्या फायनल सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने रोहित शर्माला मागे टाकले. कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा – RCB vs PBKS Final : आरसीबीची तुफान सुरुवात, आयपीएल फायनलमध्ये रचला नवा इतिहास!
टी-२० क्रिकेटच्या फायनल सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय:
- ४०७ – सुरेश रैना (१२ डाव)
- ३४४ – विराट कोहली (८ डाव)
- ३४१ – रोहित शर्मा (१२ डाव)
- २५७ – मुरली विजय (६ डाव)
- २५० – एमएस धोनी (१४ डाव)
- २३१ – मनीष पांडे (६ डाव)
- २१४ – युसूफ पठाण (८ डाव)
- २१० – वृद्धिमान साहा (४ डाव)
- २०७ – गौतम गंभीर (५ डाव)





