RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ सुसाट! आरसीबी धूळ चारत नोंदवला सलग चौथा विजय

RCB vs DC Delhi Capitals beat Royal Challengers Bangalore : केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या नाबाद १०० हून अधिक धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने बंगळुरुचा ६ विकेट्सनी पराभव केला. विशेष म्हणजे दिल्लीला आतापर्यंत चार सामने खेळताना एकही पराभव पत्करावा लागला नाही. मात्र, आरसीबीला सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात आरसीबीने दिल्लीला १६४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे दिल्लीने १७.५ षटकांत पूर्ण केले.
या सामन्यात विप्राज निगम आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने सर्वात मोठी भूमिका बजावली. यानंतर, केएल राहुलने नाबाद ९३ धावांची खेळी साकारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. याआधीही संघाला प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यावेळीही काही बदलल झाला नाही.
𝗞𝗟assy. 𝗞𝗟inical. 𝗞𝗟utch 💥
KL Rahul wins the Player of the Match award for guiding #DC home with a stunning 9⃣3⃣* 🙌
Scorecard ▶ https://t.co/h5Vb7spAOE#TATAIPL | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/PFie6BHeBf
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
मिशेल स्टार्कच्या एका षटकात कुटल्या तब्बल ३० धावा –
मात्र, यावेळी संघाची सुरुवात चांगली झाली आणि फिल सॉल्टने मैदानात येताच स्फोटक फलंदाजी केली आणि दिल्लीला बॅकफूटवर आणले, ज्यामध्ये मिशेल स्टार्कच्या एका षटकातील ३० धावांचाही समावेश होता. पण चौथ्या षटकात सगळं बदललं, जेव्हा विराट कोहली आणि सॉल्टमध्ये ताळमेळचा अभाव दिसला आणि आणि सॉल्ट धावचीत झाला. येथून, बंगळुरूचा वेग मंदावला आणि विकेट्सची रांग लागली. विप्रारज निगम, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी मधल्या षटकांमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांना रोखले.
हेही वाचा – RCB vs DC : टिम डेव्हिडचा नवा पराक्रम! पूरन-कार्तिकला मागे टाकत बनला नंबर वन फलंदाज
राहुल-स्टब्सने सावरला दिल्लीचा डाव –
KL Rahul 🤝 M. Chinnaswamy Stadium 🔝
The man from Bengaluru leading #DC's charge with a fine 5⃣0⃣👏
Updates ▶ https://t.co/h5Vb7spAOE#TATAIPL | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/OHQnWbjGqC
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
कर्णधार रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांनाही यावेळी काही विशेष कामगिरी करता आली नाही. शेवटी, टिम डेव्हिडने फक्त २० चेंडूत जलद ३७ धावा करत संघाला १६३ धावांपर्यंत पोहोचवले आणि सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले होते. यानंतर, दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि पाचव्या षटकापर्यंत संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या, तर धावसंख्या फक्त ३० धावा होती. हा धक्का भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांनी दिल्लीला दिला. ५८ धावांवर कर्णधार अक्षर पटेलही पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा वेळी, केएल राहुल मैदानावर आला आणि त्याने डावाची सूत्रे हाती घेतली आणि त्याला ट्रिस्टन स्टब्सने साथ दिली. दोघांनी मिळून हळूहळू संघाचा धावसंख्या पुढे नेली.
केएल राहुलने शेवटच्या ६ षटकांत बदलले गीअर्स –
१४ व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या फक्त ९९ धावा होती आणि ज्यामुळे त्यांनीा शेवटच्या ६ षटकात त्यांना ६५ धावांची आवश्यकता होती. यावेळी पावसाची शक्यता होती आणि डकवर्थ-लुईस स्कोअरनुसार दिल्लीचा संघ मागे होता. येथूनच केएल राहुलने गीअर्स बदलले आणि सामना बंगळुरूच्या आवाक्याबाहेर नेला. केएल राहुलने १५ व्या षटकात जोश हेझलवूडवर हल्ला चढवत २२ धावा कुटत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, राहुल आणि स्टब्सने प्रत्येक षटकात बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाला चौकार ठोकला आणि १८ व्या षटकात, राहुलने एक शानदार षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. राहुलने फक्त ५३ चेंडूत ९३ धावा काढत नाबाद राहिला, तर स्टब्सनेही ३८ धावांचे योगदान दिले.





