RCB vs CSK, IPL 2024 : चेन्नईने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्यास दिलं प्राधान्य

RCB vs CSK, IPL 2024 : आज आयपीएल 2024 स्पर्धेत ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ आमने सामने येणार आहेत. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं 21 वेळा विजय मिळवला तर 10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे.
दरम्यान पावसाचं सावट असल्याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिलं आहे. हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील अखेरचा साखळी सामना आहे.
🚨 Toss Update 🚨
Chennai Super Kings elect to bowl against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/CMJy3elx12
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
चेन्नईचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर असून त्यांना केवळ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवण्याची गरज आहे. तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपैकी एका संघाची निवड प्लेऑफसाठी होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोड, दिनेश कार्तिक, यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, महिष तिक्षाना, सिमरजीत सिंग.





