RCB Victory Celebration : आरसीबीच्या विजयाचा उत्सव; विधान सौधापासून चिन्नास्वामीपर्यंत चाहत्यांचा मेळावा!

RCB Victory Celebration in Bengaluru : आयपीएल २०२५ चा विजेता आरसीबी संघ बुधवारी दुपारी बंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर पोहोचला, तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांनी त्यांचे मोठ्या संख्येने जल्लोषात स्वागत केले. तिथे चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांनाही रस्ता मोकळा करण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघाचे विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्वागत केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांची गर्दी –
विधान सौधाकडे जात असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांनी संघाचा जयजयकार केला. वातावरणात उत्साह आणि जल्लोष स्पष्टपणे दिसून येत होता. त्यानंतर बंगळुरूचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. कारण आरसीबीने तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलचे पहिलते जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने १९१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ ७ बाद १८७ धावाच करु शकला.
WHAT A WELCOME FOR RCB IN BENGALURU. pic.twitter.com/8KFfcxiWj4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
#WATCH | Bengaluru: #RoyalChallengersBengaluru star player Virat Kohli received by Karnataka Deputy CM DK Shivakumar at the airport
#RoyalChallengersBengaluru clinched their first #IPL trophy yesterday after defeating Punjab Kings
(Source: Office of DK Shivakumar) pic.twitter.com/dMlM7aUezg
— ANI (@ANI) June 4, 2025
मंगळवारी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव करून आरसीबीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद पटकावले. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, आरसीबीचे खेळाडू चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचतील, जिथे ते चाहत्यांना संबोधित करतील आणि ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करतील.
हेही वाचा – बंधू प्रेम! भावा तुझा अभिमान वाटतो; कुणालासाठी हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट
खुल्या छताची बस परेड होणार नाही –
Anushka Sharma Instagram Story
– These happy faces waited for this very lovingly and patiently ❤️ pic.twitter.com/q6CSmNMnzP
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 4, 2025
गुरुवारी बंगळुरू वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विधान सौधा ते स्टेडियमपर्यंतची बहुप्रतिक्षित खुल्या छताची बस परेड वाहतुकीच्या अडचणींमुळे होऊ शकत नाही. शहरातील पावसाच्या वातावरणामुळेही अधिकाऱ्यांना असा निर्णय घ्यावा लागला असावा. यासोबतच, आरसीबीच्या विजयानंतर काल रात्री गर्दी नियंत्रित करण्यात पोलिसांना खूप अडचण आली. जर मुख्यमंत्र्यांनी विशेष परवानगी दिली तर परेड अजूनही होऊ शकते, कारण त्यांच्या कार्यालयाजवळ एक खुली बस उभी आहे.





