बंधू प्रेम! भावा तुझा अभिमान वाटतो; कुणालासाठी हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट

Posted by Hardik Pandya : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. आरसीबी कि पंजाब यावर पैज्या लागल्या होत्या. अखेर आरसीबीने आयपीएल २०२५ चा विजेता होण्याचा बहुमान पटकावला. संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळी करत पंजाब किंग्सला पराभवाजी धूळ चारली. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला 6 धावांनी हरवून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
या विजयानंतर देशभरातून आरसीबी संघाला विजयाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींनी देखील आरसीबीला शुभेच्छा दिल्या. २०२५ चा आयपीएल आरसीबी विजेता संघ झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्याने भाऊ कुणाल पांड्यासाठी स्टोरी शेअर केली. आरसीबीला विजय मिळवून देण्यात कुणाल पांड्याचा देखील मोठा वाटा आहे. अंतिम सामन्यात भावाने केलेली उत्तम खेळीचे कौतुक हार्दीक पांड्याने स्टोरी शेअर करत केले आहे.
मॅचनंतर हार्दिक पंड्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रुणाल पंड्याचा एक फोटो शेअर केला. आता डोळ्यातून अश्रू वाहतायत, तुझा अभिमान वाटतो भावा, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टमधून दोन्ही भावांमध्ये असलेला बॅान्ड किती मजबूत आहे, हे स्पष्ट होते. भावाच्या विजयाने हार्दिकला भावूक बनवलं. सोशल मीडियावर त्याची ही स्टोरी व्हायरल झाली आहे.
भाई के लिए एक भाई की मोहब्बत —
हार्दिक पंड्या की इंस्टा स्टोरी pic.twitter.com/jpULFLmQPY
— Shaurya Mishra (@shauryabjym) June 3, 2025
कशी राहिली कुणाल पांड्याची खेळी?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स असा खेळला गेला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचे लक्ष्य पंजाब किंग्ससमोर ठेवले होते. कुणाला पांड्याने आपली उत्तम खेळी करत 4 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्याच्या टाईट गोलंदाजीने पंजाबवर दबाव वाढवला आणि आरसीबने हा सामना ६ धावांनी जिंकला.





