Bengaluru Stampede : आरसीबीच्या ‘त्या’ पोस्टने घेतले ११ जणांचे प्राण, चौकशीची टांगती तलवार!

Bengaluru Stampede before RCB’s Post Under Scrutiny : बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या पहिल्या आयपीएल जेतपदाच्या विजयी रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. इतकी मोठी दुर्घटना होऊनही आयोजकांनी कार्यक्रम सुरू ठेवला होता, ज्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, सोशल मीडिया पोस्टमुळे आरसीबीचे मॅनेजमेंट अडचणीत सापडली आहे. या पोस्टसाठी त्यांची चौकशी केली जाणार आहे. ती पोस्ट काय होती? जाणून घेऊया
खरं तर, चेंगराचेंगरीच्या काही तास आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोशल मीडियावर सार्वजनिक विजय परेडची घोषणा केली होती, ज्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. यानंतरही आपल्या संघाच्या पहिल्या आयपीएल विजयाचा आनंद पाहण्यासाठी आलेला चाहत्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक जण जखमी झाले आहे. या सर्वांसाठी आता आरसीबीने मॅनेजमेंटकडून करण्यात आलेल्या पोस्टची चौकशी होणार आहे.
★ Who do you hold responsible for the death of 11 people and the stampede in Bengaluru?
Please give your answer by commenting. pic.twitter.com/8asD1SswYv
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) June 4, 2025
काय होती आरसीबीची पोस्ट?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अधिकृत एक्स अकाउंटने बुधवारी संध्याकाळी ३:१४ वाजता विजय परेडची घोषणा केली होती. जी विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत होणार होती. त्यानंतर स्टेडियमच्या आत सत्कार समारंभ होणार होता. पोस्टमध्ये मोफत पासची लिंक देखील होती, ज्यामध्ये मर्यादित प्रवेशाची घोषणा करण्यात आली होती आणि चाहत्यांना पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करण्यात आली होती.
हेही वाचा – Match Fixing : क्रिकेट विश्वात खळबळ; श्रीलंकेचा विश्वविजेता खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी!
आरसीबीच्या मॅनेजमेंटची चौकशी होणार –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या मॅनेजमेंटला विजय परेडच्या सोशल मीडिया पोस्टसाठी अधिकृत चौकशीला सामोरे जावे लागेल. बुधवारी संध्याकाळी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या काही तास आधी आरसीबीने सार्वजनिक विजय परेडची घोषणा केली होती, ज्यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चौकशीत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांचाही समावेश असेल, ज्यांच्या सत्कार समारंभाच्या नियोजनातील भूमिकेचा आता बंगळुरू पोलीस आणि दंडाधिकारी चौकशी पॅनेलकडून आढावा घेतला जात आहे.





