PBKS vs RCB : जितेश शर्माने ‘सुपरमॅन’प्रमाणे हवेत झेपावत घेतला अद्भुत कॅच, VIDEO होतोय व्हायरल

PBKS vs RCB Jitesh Sharma’s Stunning Catch Video Viral : आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जाच ८ विकेट्सनी दारुण पराभव करत चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम धारदार गोलंदाजीच्या जोरावर १०१ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १० षटकांत विजयावर शिक्कामोर्तब करत ९ वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यादरम्यान जितेश शर्माने एक असा झेल घेतला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधलं. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
जितेश शर्माने घेतला शानदार झेल –
सामन्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण तेव्हा आला जेव्हा आरसीबीचा यष्टिरक्षक जितेश शर्माने हवेत झेपावत एक जबरदस्त झेल टिपला. हा झेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना १५व्या षटकातील आहे, जेव्हा जोश हेझलवूड गोलंदाजी करत होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर पंजाब किंग्जचा फलंदाज अजमतुल्लाह उमरजईने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या काठावर लागून वर उडाला. यावेळी यष्ट्यांमागे उभ्या असलेल्या जितेश शर्माने सुपरमॅनप्रमाणे हवेत उंच उडी मारली आणि एक अप्रतिम झेल घेतला.
व्हिडीओ होतोय व्हायरल –
#RCB are pumped and HOW 🤩
Sharp catch by Jitesh Sharma and #PBKS are 4️⃣ down 👌
High quality over from Josh Hazlewood 🫡
Updates ▶ https://t.co/7fIn60rqKZ #TATAIPL | #RCBvPBKS | @RCBTweets pic.twitter.com/O8F4deioAZ
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
हा झेल पंजाब किंग्जच्या डावातील शेवटची विकेट ठरली. जितेश शर्माच्या या शानदार प्रयत्नाने पंजाबच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळाल्या. जितेश शर्माने घेतलेला झेल चपळाई आणि जबरदस्त क्रीडा कौशल्याचे उदाहरण ठरले. आरसीबी गोलंदाज आणि जितेश यांच्या या कामगिरीने संघाला मोठा विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीकडे वाटचाल मजबूत केली.
हेही वाचा – PBKS vs RCB : आरसीबीने पंजाबचा धुरळा उडवत नऊ वर्षांनी फायनलमध्ये मारली धडक, गोलंदाज ठरले गेमचेंजर
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर पंजाब किंग्जच्या फलंदाजांची चांगलीच दाणादण उडाली. आरसीबीकडून जोश हेझलवूडने २१ धावांत ३, सुयश शर्माने ३, यश दयालने २, भुवनेश्वर कुमारने १ आणि रोमारियो शेफर्डने १ विकेच्स घेत पंजाब किंग्जचा संघ १०१ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात आरसीबीने विराट (१९) आणि मयंकची (११) विकेट गमावून फिलिप सॉल्ट (५७) आणि कर्णधार पाटीदारच्या (१५) नाबाद खेळीच्या ऐतिहासिक विजय मिळवला.





