RCB vs GT Final : आरसीबीने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास! फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा उडवला धुव्वा
RCB vs GT Final : 'क्रिकेटचा किंग' विराट कोहलीने आपल्या 'रन चेझ'चा बादशाही अंदाज दाखवत नाबाद ७५ धावांची खेळी केली आणि विनिंग सिक्स मारत आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

RCB vs GT Final RCB wins IPL 2026 Trophy : आयपीएल २०२६ चा काऊंटडाऊन अखेर एका ऐतिहासिक महाविजयाने संपला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह आरसीबीने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलत इतिहास रचला आहे. आरसीबी आता सीएसके(२०१०-११) आणि मुंबई इंडियन्स (२०१९-२०) नंतर सलग दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील तिसरा संघ बनला आहे.
विराट कोहलीची सर्वात वेगवान फिफ्टी; आरसीबीची तुफानी सुरुवात!
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील ९०,०१४ चाहत्यांनी खचाखच भरलेल्या मैदानावर आरसीबीच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या अद्भूत कामगिरीमुळे हा खिताबी सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. ‘क्रिकेटचा किंग’ विराट कोहलीने आपल्या ‘रन चेझ’चा बादशाही अंदाज दाखवत नाबाद ७५ धावांची खेळी केली आणि विनिंग सिक्स मारत आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. १५६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये वेंकटेश अय्यरने कागिसो रबाडाला धुवून काढत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावा कुटल्या.
Finishing off in style 🥳
And it’s none other than King Kohli 😎👑
Scorecard ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/FZNGQ26gBs
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने मोहम्मद सिराजला ३ चौकार आणि १ सिक्स मारत १९ धावा वसूल केल्या आणि संघाचे अर्धशतक पूर्ण केले. वेंकटेश अय्यर १६ चेंडूंत ३२ धावा (४ चौकार, २ षटकार) करून बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कल (१ धाव) बाद झाला, ज्याची विकेट घेत कागिसो रबाडाने भुवनेश्वर कुमारला मागे टाकत ‘पर्पल कैप’वर कब्जा केला. कॅप्टन रजत पाटीदार १५ धावांवर बाद झाल्यावर सामन्यात थोडी चुरस निर्माण झाली होती. मात्र, विराट कोहलीने केवळ २५ चेंडूंत आपल्या आयपीएल करिअरमधील सर्वात वेगवान फिफ्टी (फास्टेस्ट अर्धशतक) ठोकून सामना गुजरातच्या हातातून हिरावून घेतला. विराटने ४२ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली.
𝘾.𝙃.𝘼.𝙈.𝙋.𝙄.𝙊.𝙉.𝙎 🏆🏆@RCBTweets have done it again ❤️#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/ww2zB98Xb8
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
गुजरातचा डाव १५५ धावांवर रोखला; आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर!
📸📸 Let the celebrations beginnnnn ❤️
Scorecard ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/QVU3ams8Hp
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून आरसीबीने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अहमदाबादच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातला २० षटकांत ८ विकेट्सवर अवघ्या १५५ धावांवर रोखले. आरसीबीसाठी रासिख सलामने अप्रतिम गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. क्रुणाल पंड्याने १ विकेट्स घेतली.
गुजरातकडून केवळ वॉशिंग्टन सुंदरने लढा दिला, त्याने ३७ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५० धावांची खेळी केली. शुक्रवारी खेळलेल्या ‘क्वालिफायर-२’ चा थकवा आणि खराब हवामानामुळे अहमदाबादला पोहोचण्यास झालेला उशीर याचाही गुजरातच्या कामगिरीवर परिणाम झाला. पॉवरप्लेमध्येच कर्णधार शुबमन गिल (१०) आणि साई सुदर्शन (१२) स्वस्तात बाद झाल्यामुळे गुजरातचा डाव पूर्णपणे गडगडला. जोस बटलर (१९) आणि निशांत सिंधू (२०) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. गुजरातच्या संपूर्ण इनिंगमध्ये केवळ ३ षटकार मारले गेले, यावरूनच आरसीबीच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा अंदाज येतो.





