महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द
Updated On:

मुंबई – कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर रिर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या गैरकारभारामुळे परवाना रद्द केला असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. गुरुवारपासून बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहेत. यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, याआधीच आरबीआयने सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली.





