Ravindra Chavan: दुष्काळग्रस्त भागाच्या पाठीशी सरकार उभं – रवींद्र चव्हाण
Ravindra Chavan: अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी याठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आगमन झाले.

Ravindra Chavan: अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी याठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आगमन झाले. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित रॅलीत त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश वानखेडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार प्रताप अडसड आणि आमदार उमेश यावलकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. तसेच आश्रम परिसराची पाहणी करत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे पाऊस वेळेवर न आल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली आहे. या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली.





