पिंपरी | रविंद्र भेगडे यांनी मानले बांधकाम मंत्र्यांचे आभार

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – इंदुरी कुंडमळा येथील जोडस्त्यासह इंद्रायणी नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्यातर्फे ग्रामस्थांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांचा सत्कार करुन आभार मानण्यात आले.
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर जोडस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला. यासंबंधीचे मंजुरी पत्र देखील रविंद्र भेगडे यांना प्राप्त झाले होते.
त्यामुळे पूर्वनियोजित दौऱ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे पुणे येथे आले असता, रविंद्र भेगडे यांनी इंदोरी कुंडमळा येथील ग्रामस्थांसह मंत्री चव्हाण यांची भेट घेतली.
तसेच समस्त ग्रामस्थ कुंडमळा इंदोरी व मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले.याप्रसंगी दत्तात्रय भेगडे, संजय भेगडे, मनोहर भेगडे, सूर्यकांत भेगडे, गुलाब भेगडे, अशोक भेगडे, गणेश भेगडे, सचिन भेगडे, मयुर शेलार उपस्थित होते.





