पिंपरी | इंद्रायणी नदीवरील पुलाबाबत तहसीलदारांना निवेदन

वडगाव मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील विविध समस्यांबाबत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
यात प्रामुख्याने कार्ला ते मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पूल वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी भेगडे यांच्यासमवेत ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी आणि सरपंच संतोष बांदल उपस्थित होते.
कार्ला-मळवली गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणि पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांचे उद्योग व्यवसाय अडचणीत आले असून प्रशासनाने तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक दाखले त्वरित उपलब्ध करून द्यावेत, मावळ विधानसभा मतदारसंघातील बोगस व दुबार मतदारांची नावे कमी करावी याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.





