“सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल” ; रविकांत तुपकरांनी सरकारला का दिला इशारा ? वाचा सविस्तर

Ravikant Tupkar on State Govt । राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेण्याचे काम नेत्यांकडून सुरु आहे. यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल Ravikant Tupkar on State Govt ।
काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. “कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागण्यांसाठी आम्ही एक राज्यव्यापी आंदोलन उभं करणार आहोत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन न भूतो न भविष्यति असं असेल. मग या राज्यातील सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, असा इशारा रविकांत तुपकरांनी माध्यमांशी बोलताना दिला.
चार दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा…Ravikant Tupkar on State Govt ।
“राज्य सरकारला आमचं एकच सांगणं आहे की, दोन ते चार दिवसांत आमच्या मागण्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा येणाऱ्या काळात कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीसह आदी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन उभं करणार आहोत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन न भूतो न भविष्यति असं असेल. तसेच या राज्यातील सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल. अशा पद्धतीचं आंदोलन असेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की, पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या. आपण जातीसाठी एकत्र येतो तर मग मातीसाठी देखील एकत्र आलं पाहिजे”, असेही रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.





