रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक; नेमकं काय घडलं?

Ravikant Tupkar | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरु होते. याचवेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात तुपकर मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. सरकारच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो, असं रविकांत तुपकर म्हणाले. Ravikant Tupkar |
बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात रविकांत तुपकर यांनी मुक्काम आंदोलन सुरू करत जिल्हा कृषी अधिक्षकांना फैलावर घेतले. यावेळी ते बिस्तरा घेऊन येथे उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. मात्र गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. Ravikant Tupkar |
याशिवाय रविकांत तुपकर यांनी सरकारच्या या हुकूमशाहीचा मी निषेध करतो. शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा, असं आवाहन केले. तर शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाही? असा सवाल अॅड. शर्वरी तुपकर यांनी केला आहे.





