‘नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील…’; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं उडाली खळबळ

Ravi Rana | Uddhav Thackeray | Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचे 19 एप्रिलपासून सुरू झालेले मतदान 1 जून रोजी सातही टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकाल येत्या 4 जून रोजी मंगळवारी जाहीर होणार आहे.
त्यापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यातून एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असून पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता राज्यातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, अश्यातच अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला असून त्यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील.’ असं रवी राणा म्हणाले आहेत.
येणारा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे च गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असे खोचक वक्तव्यही रवी राणा यांनी केले.
नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा यांनी केला. राणांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.





