Raveena Tandon: रवीना टंडनलला ‘मोहरा’ चित्रपटाची आठवण; शेअर केला अक्षय कुमार-सुनील शेट्टीसोबत फोटो
Raveena Tandon: रवीनाने 'वेलकम टू द जंगल'च्या शूटिंगच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची जोडी २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्यांच्यासोबत सुनील शेट्टी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकतेच रवीनाने ‘वेलकम टू द जंगल’च्या शूटिंगच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रवीना मध्यभागी उभी असून अक्षय आणि सुनील तिच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. रवीनाने दोघांचे हात पकडले आहेत. (Raveena Tandon)
या तिघांचा फोटो पाहून अनेकांना १९९४ मधील त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मोहरा’ चित्रपटाची आठवण झाली. या तिघांनी ‘मोहरा'( Mohara) चित्रपटात एकत्र काम केले होते. हा फोटो देखील त्यांनी ‘मोहरा’ चित्रपटातील आयकॉनिक फोटोसारखाच हुबेहूब रीक्रिएट केला आहे. तोही फोटो तिने शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत रवीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘वेलकम टू द जंगल… वेलकम टू द फन अँड गोलमाल. उद्याच्या ट्रेलर लॉन्चसाठी सर्वांना ऑल द बेस्ट! मी या सोहळ्याला खूप मिस करेन. लंडनहून तुम्हा सर्वांसाठी खूप खूप प्रेम. (हा कदाचित पार्ट २ चा टायटल असू शकतो.)’
या पोस्टवर अभिनेत्री दिशा पाटनीने कमेंट करत लिहिले, “आम्ही तुम्हाला खूप मिस करू. प्लीज लवकर परत या.” रवीनाने शेअर केलेल्या इतर फोटोंमध्ये दिशा पाटनी आणि जॅकलिन फर्नांडिस देखील तिच्यासोबत पोझ देताना दिसत आहेत. Raveena Tandon
चित्रपटात दिसणार कलाकारांची तगडी फौज (Raveena Tandon)
या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर गुरुवारी रिलीज होणार आहे. मात्र, रवीनाने आपल्या पोस्टमधून हे स्पष्ट केले आहे की, ती सध्या लंडनमध्ये असल्यामुळे ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Welcome To The Jungle (2026)
अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट २६ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी यांच्यासोबतच संजय दत्त, दिशा पाटनी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, तुषार कपूर, परेश रावल, जॉनी लिव्हर, राहुल देव, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी आणि कीकू शारदा यांसारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. (Raveena Tandon)
हेही वाचा:





