मोठी बातमी ! ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रऊफ अझहरचा खात्मा

Rauf Azhar । भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये एक मोठा दहशतवादी मारला गेला. भारतीय सैन्याने कंदहार अपहरणाचा सूत्रधार रऊफ अझहरला ठार केले. तो एका क्षेपणास्त्र हल्ल्यात मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याची पाकची कबुली Rauf Azhar ।
अब्दुल रऊफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा मोठा दहशतवादी होता. आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो या अपहरणाचा सूत्रधार होता. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता. यामध्ये भारतीय लष्करासह हवाई दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानने स्वतः कबूल केले की भारताच्या हल्ल्यात त्यांचे अनेक लोक मारले गेले.
पहलगाम हल्ल्याचा बदला मंगळवारी आणि बुधवारी रात्री भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर लष्कराने हल्ला करून ते उद्धवस्त केले. यात आतापर्यंत यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, “ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.’ असे म्हणत पाकिस्तानविरुद्ध आणखी मोठी कारवाई होणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
कंदहार अपहरण,अमेरिकन पत्रकाराच्या हत्येसाठी जबाबदार Rauf Azhar ।
आयसी-८१४ अपहरण करण्यात रऊफ अझहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर, अल-कायदाचा प्रमुख कार्यकर्ता उमर सईद शेख याला सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर अल-कायदाचा दहशतवादी उमर सईद शेख याने वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या अमेरिकन-ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करून हत्या केली. २००२ मध्ये पर्लच्या हत्येने जगाला धक्का बसला.





