Nagar | रासपचा निर्धार, विधानसभेच्या रणांगणात उतरणार

शेवगाव, (प्रतिनिधी) – येत्या २९ ऑगष्टला राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा अकोला येथे साजरा होत असून, या कार्यक्रमासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या व्यासपिठावरूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती पक्षाचे निवडणूक निर्णय निरीक्षक डॉ.प्रल्हाद पाटील यांनी दिली .
पाटील म्हणाले, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार रासपच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर अगोदरच शिक्कामोर्तब झाला असून, यासंदर्भात नियोजनासाठीची आढावा बैठक ही पडलेली आहे.
लवकरच या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात तयारी करण्यात आली आहे. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला रासप पक्ष सामोरे जाणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा अकोला येथे २९ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.





