Rasika Sunil : हिरव्या रंगाची साडीत रसिका सुनीलचा मोहक अंदाज
Rasika Sunil : रसिका साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार

Rasika Sunil: अभिनेत्री रसिका सुनीलने आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. रसिकाने नुकतेच हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये तिचा साधा, मोहक अंदाज चाहत्यांना विशेष भावला. पारंपरिक वेशभूषेला आधुनिक स्टाईलची जोड देत तिने पुन्हा एकदा फॅशनप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Rasika Sunil)
या फोटोंमध्ये रसिकाने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर चॉकलेटी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. मोकळे केस, हलका मेकअप आणि तिची किलर पोझ यामुळे अनेकांकडून तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. रसिका सुनीलने आपल्या पारंपरिक लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी ऑक्सिडाइज्ड झुमक्यांची निवड केली होती. (Rasika Sunil)
हिरव्या साडी आणि ब्राऊन ब्लाऊजसोबत हे झुमके अतिशय सुंदर खुलून दिसत होते. कोणतेही जड दागिने न घालता केवळ स्टेटमेंट झुमक्यांमुळे तिच्या संपूर्ण लूकला एलिगंट आणि मराठमोळा टच मिळाला कमीत कमी अॅक्सेसरीज वापरूनही तिचा लूक अतिशय क्लासी आणि रॉयल दिसत होता. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. (Rasika Sunil)
रसिका सुनीलचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि पारंपरिक लूकचं भरभरून कौतुक केलं. “हिरवा रंग तुझ्यावर खूपच खुलून दिसतो,” “खऱ्या अर्थाने मराठमोळं सौंदर्य,” ‘नॅशनल क्रश’, “साधेपणातही किती सुंदर दिसतेस,” “मराठमोळेपण जप,” “तू साडीतच सर्वात सुंदर दिसतेस,” अशा कमेंट्स केल्या आहेत. (Rasika Sunil)
रसिका सुनीलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. आता लवकरच रसिका साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘GDN’ असे आहे. (Rasika Sunil)
हेही वाचा:






