Rashtriya Swayamsevak Sangh: संविधान संवर्धनासाठी स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे
Rashtriya Swayamsevak Sangh:

विजयादशमीला तरुणांची ५९ सघोष पथसंचलने; संघाच्या शताब्दी वर्षातील कार्याचा आढावा
Rashtriya Swayamsevak Sangh: आज जगभरात अराजकतेच्या माध्यमातून सांविधानिक व्यवस्थांवर हल्ले केले जात आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय सांविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी संघ स्वयंसेवकांनी सदैव अग्रेसर राहिले पाहिजे, असा स्पष्ट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंगळवारी झालेल्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवातून देण्यात आला.
दसऱ्याच्या निमित्ताने शहरात संघाची ५९ सघोष पथसंचलने झाली. यामध्ये २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. बाल विभागासह उर्वरित संचलने आठवडाभरात पार पडणार आहेत. सर्वच शस्त्रपूजन उत्सवांमध्ये संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचे सिंहावलोकन करण्यात आले.
आगामी काळातील देशासमोरील आव्हाने आणि पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्यावर या वेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाचा झालेला विस्तार, गृहसंवाद अभियान, हिंदू संमेलने आणि प्रबुद्ध नागरिकांच्या बैठकांचा आढावा या वेळी घेण्यात आला.





