Teacher Award 2026 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ 2 शिक्षिकांचा समावेश
Teacher Award 2026 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची यादी जाहीर झाली आहे. उत्तर प्रदेशातील 3 शिक्षकांसह महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील शिक्षकांची निवड झाली आहे.

Teacher Award 2026 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. देशातील विविध राज्यांमधून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एकूण 48 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्रातील दोन शिक्षिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून साने गुरूजी निवासी विद्यालय केजच्या डाॅ. कविता नरसिंगराव गित्ते आणि एनएमसी स्कूल आनंदवाडी नाशिकच्या कुंदा जयवंत बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रसह अनेक राज्यांतील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने उल्लेखनीय उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना या पुरस्कारातून गौरवण्यात येणार आहे.






