पाटणा – बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) अध्यक्षाची निवड ऑक्टोबरमध्ये होणार आहे. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हेच अध्यक्षपदी कायम राहणार की राजकीय वारसदार असणारे पुत्र तेजस्वी यांच्याकडे सुत्रे सोपवणार याविषयी आता उत्सुकता असेल.
लालूंनी 1997 मध्ये राजदची स्थापना केली. तेव्हापासून सलग 11 वेळा ते पक्षाचे अध्यक्ष बनले. मात्र, वयाची पंचाहत्तरी गाठणाऱ्या लालूंची प्रकृती बराच काळपासून व्यवस्थित नाही. त्यामुळे आता ते अध्यक्षपदावरून पायउतार होतील आणि तेजस्वी यांच्याकडे धुरा सोपवतील, अशा चर्चा सुरू आहेत.
अशातच राजदच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष म्हणून तेजस्वी यांची निवड निश्चित मानली जात आहे. लालू तुरूंगात असताना तेजस्वी यांनी प्रभावीपणे पक्षाची जबाबदारी सांभाळली. त्यातून त्यांनी पक्षावर वर्चस्व निर्माण केले.
महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; मुंबई बँक अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड
त्याशिवाय, तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली 2020 मधील विधानसभा निवडणुकीत राजदने बिहारमधील सत्तारूढ एनडीएला जोरदार टक्कर दिली. त्यामुळे त्या राज्यातील जनतेतही त्यांचे नेतृत्व प्रस्थापित झाल्याचे चित्र आहे.